top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

मुंबई महानगरपालिका निवडणूक; भाजप कार्यकारिणीची आज बैठक

मुंबई: गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनेशी युती तुटल्यामुळे भाजपकडून मुंबई महानगरापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी मुंबई भाजप कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक आज दादरच्या वसंतस्मृती येथील कार्यालयात होणार आहे. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीत मुंबईतील भाजपच्या संघटनात्मक बांधणी आणि महानगरापालिका निवडणुकीच्या रणनीतीविषयी चर्चा होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी पाच वाजता ही बैठक सुरु होईल. या बैठकीला मुंबईतील भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक, आमदार आणि खासदार उपस्थित असतील. त्यामुळे आता या बैठकीत काय घडणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे.

classi 2.jpg
bottom of page