top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

जन्मदात्या आईनेच केली दीड महिन्याच्या मुलीची हत्या

वसई गावातील पाचूबंदर परिसरात जन्मदात्या आईनेच दीड महिन्याच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकारानंतर परिसरात खळबळ उडालीय. मुलाच्या हव्यासापोटी तिने मुलीची हत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला. त्यात जुळ्या मुली झाल्याने ती अधिकच नाराज झाली होती. त्यानंतर जुळ्या मुलींपैकी एकीला घराच्या पाण्याच्या टाकीत बुडवून तिनं पोटच्या मुलीची हत्या केली. याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आईला वसई पोलिसांकडून अटक करण्यात आलीय.पुढील तपास पोलीस करत आहेत .

classi 2.jpg
bottom of page