top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

भारतीय अर्थव्यवस्थेवर जगालाही विश्वास -पंतप्रधान मोदी

कोरोना काळातही भारतात विक्रमी परदेशी थेट गुंतवणूक झाली असून भारतीय अर्थव्यवस्थेवर जगालाही विश्वास आहे, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘एएसएसओसीएचएएम’ (ASSOCHAM) संमेलनात केलं. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, आपल्या सामर्थ्याच्या बळावर व संसधानांवर विश्वास करत आत्मनिर्भर भारत पुढे वाटचाल करत आहे. उद्दिष्टपुर्तीसाठी उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी सातत्याने सुधारणा करत आहोत. तसेच नव्या तंत्रज्ञानाच्या रुपात आव्हानं देखील येतील. आपले उद्दिष्ट केवळ आत्मनिर्भर भारतच नाही. तर आपण हे उद्दिष्ट किती लवकर साध्य करू शकतो, ही वेळ भारतीय उद्योग जगाताच्या रुपाने तुमची क्षमता, बांधिलकी व धैर्य जगाला दाखवून देण्याची आहे.

classi 2.jpg
bottom of page