top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

मुलीला मोबाइल दिला अन संसार मोडण्याची वेळ आली

कोरोनामुळे घरातूनच मुलांचे ऑनलाइन शिक्षण सुरु आहे. लॅपटॉप किंवा मोबाइलच्या माध्यमातून मुलं शाळांच्या या ऑनलाइन वर्गाला उपस्थित राहतात. कर्नाटकातील मांडयामध्ये मुलीला ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइल फोन देणं, एका पित्याला चांगलच महाग पडलं अन त्याच्यावर संसार मोडण्याची वेळ आली. १२ वीत असणाऱ्या आपल्या मुलीला ऑनलाइन वर्गाला उपस्थित राहता यावे, यासाठी एका पित्याने आपला मोबाइल मुलीला दिला. हा फोन वापर असताना तिला वडिलांचा दुसऱ्या एका महिलेसोबत व्हिडीओ दिसला. त्याने प्रणयाचा तो व्हिडीओ रेकॉर्ड करुन मोबाइलमध्ये सेव्ह केला होता. याबद्दल तिने लगेच आईला सांगितल्यानंतर कुटुंबात मोठा वाद निर्माण झाला आहे. पतीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे पत्नीला आता विभक्त व्हायचे आहे. पण नवरा त्यासाठी तयार नाहीय. त्यांच्या लग्नाला १८ वर्ष झाली आहेत.

classi 2.jpg
bottom of page