top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

… आदेशानंतर संघर्ष करावाच लागेल

“वीज बिला संदर्भात निवेदन, अर्ज, बैठका, विनवण्या सगळं झालं. पण सरकार ढिम्म आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी साहेबांच्या आदेशानंतर रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल. कारण लाथो के भूत बातों से नही मानते,” असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सरकारला दिला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली संतप्त प्रतिक्रिया दिली.

उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या अखत्यारीतील अर्थ विभागाने राऊत यांची सवलतीची मागणी फेटाळल्याने वाढीव वीज देयकांतून ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता मावळली. त्यामुळे ग्राहकांमध्ये संतापाची भावना आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ऊर्जामंत्र्यांवर टीकाही करण्यात आली होती. आता मात्र मनसेनं संघर्ष करावाच लागेल असं म्हणत इशारा दिला आहे.

classi 2.jpg
bottom of page