top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीमध्ये सहभागी होण्यास जिंतेंद्रसिंह मान यांचा नकार

सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीमधील चारही सदस्य हे कृषी कायद्यांचे समर्थन करणारे आहेत असा आरोप वारंवार करण्यात येत होता. याच पार्श्वभूमीवर आज भारती किसान यूनियनचे अध्यक्ष जिंतेंद्रसिंह मान यांनी एक पत्रक जारी केलं. सर्वोच्च न्यालयालाच्या निकालाचा मान ठेवत आपण या समितीमधून सदस्य म्हणून नाव मागे घेत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. देशातील शेतकऱ्यांच्या हिताशी कोणतीही तडजोड केली जाऊ नये म्हणून मी हा निर्णय घेत आहे. मी या समितीमधून नाव मागे घेतोय आणि मी कायमच शेतकरी तसेच पंजाब सोबत उभा राहीन,” असं मान यांनी प्रसारमाध्यमांसाठी जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटलं आहे.

classi 2.jpg
bottom of page