top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

माळशिरस ग्रा.पं. : 26 पैकी 22 ग्रामपंचायतीवर मोहिते-पाटील गटाचंच वर्चस्व

सोलापूर : माळशिरस तालुक्यातील ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा मोहिते-पाटील गटाचंच वर्चस्व पाहायला मिळत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या 26 पैकी 22 ग्रामपंचायतीवर मोहिते-पाटील गटाचा विजय झाला आहे. त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील यांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. माळशिरस तालुक्यातील विझोरी ग्रामपंचायतीवर भाजपच्या मोहिते-पाटील गटानं सत्ता कायम राखली आहे. त्याचबरोबर विठ्ठलवाडीमध्ये 7 पैकी 7 ही जागांवर विजयसिंह मोहिते पाटील गटानं आपला झेंडा फडकावला आहे. येळीव, विजयवाडी आणि खवळे ग्रामपंचायतीवरही विजयसिंह मोहिते पाटील गटाचा विजय झाला आहे.

classi 2.jpg
bottom of page