top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

कोणाच्या जाण्याने काही संपत नाही-महाजन

भाजप हा व्यक्तिकेंद्रीत पक्ष नसून तो विचारावर चालणारा पक्ष आहे. मी गेलो म्हणून संपले असे होत नाही. जाणारे जातात पण कोणाच्याही जाण्याने काहीच संपत नसते, असा टोला भाजप नेते गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांना नामोल्लेख न करता लगावला, ते पाचोरा येथे भाजप कार्यालयाच्या उदघाटनप्रसंगी बोलत होते. भाषणे देऊन आणि ऑनलाइन संवाद साधून लोकांचे प्रश्न सुटत नाहीत. राज्यात पहिल्यांदाच निष्क्रीय आणि बेजबाबदार सरकार सत्तेवर आले आहे. या सरकारला जनतेच्या प्रश्नांशी काहीच देणे घेणे नाही, अशी टीका महाजन यांनी केली.

classi 2.jpg
bottom of page