top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

लालू प्रसाद यादव यांची प्रकृती चिंताजनक

राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर रांचीतील ‘रिम्स’मध्ये उपचार सुरू आहे. लालू प्रसाद यादव यांच्या फुफ्फुसात पाणी झालं असून, चेहऱ्यावर सूज आली आहे. तसेच एक किडनीही खराब झाली असून प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती लालू प्रसाद यादव यांचे सुपूत्र आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी माध्यमांना दिली. लालू प्रसाद यादव यांना दिल्लीतील एम्समध्ये हलवण्याची शक्यता असून, तेजस्वी यादव उद्या मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेणार आहेत.

तुरूंगवास भोगत असलेल्या लालू प्रसाद यादव यांच्यावर मागील काही महिन्यांपासून रांचीतील रिम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, दिवसेंदिवस त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे. प्रकृती चिंताजनक असल्यानं शुक्रवारी रात्री कुटुंबातील सदस्यांनी लालू प्रसाद यादव यांची भेट घेतली. माजी मुख्यमंत्री व पत्नी राबडी देवी, सुपूत्र तेजस्वी यादव, तेज प्रताप यादव आणि मुलगी मिसा भारती यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल डॉक्टरांशी चर्चा केली. लालूंना भेटण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना विशेष परवानगी देण्यात आली होती. तब्बल पाच तास सर्वजण लालूंसोबत होते. लालू प्रसाद यादव यांची भेट घेतल्यानंतर तेजस्वी यादव यांनी माध्यमांना त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली.

classi 2.jpg
bottom of page