top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

साखर कारखान्यात दुर्घटना; दोन ठार, सहा जखमी

सोलापूर-पुणे महामार्गावरील मोहोळ तालुक्यातील अनगर येथे लोकनेते साखर कारखान्यातील मिथेन गॅसची टाकी खाली कोसळून झालेल्या वायुगळतीमुळे झालेल्या दुर्घटनेत दोघे ठार तर सहाजण जखमी झाल्याची दुर्देवी घटना २२ नोव्हेंबर रोजी रात्री १२ ते १ च्या दरम्यान घडली . कारखान्याचे गाळप सुरू असताना अचानक मिथेन गॅसच्या टाकीत असणाऱ्या गॅसचे टाकीमधील गॅस व लिक्वीडचे प्रमाण कमी जादा झाल्याने टाकी खाली कोसल्याने ही दुर्देवी घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसानी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी सोलापूरला पाठविले.

classi 2.jpg
bottom of page