top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

लडाखमध्ये भारतीय लष्कराने चीनच्या सैनिकाला पकडलं

पूर्व लडाखच्या चुशूल सेक्टरमधील गुरंग हिल भागात शनिवारी भारतीय लष्कराने चीनच्या एका सैनिकाला पकडले. पीपल्स लिबरेशन आर्मीचा हा सैनिक चुकून भारतीय हद्दीत आल्याची माहिती मिळत आहे. आज उशिरा किंवा उद्या रविवारी या सैनिकाला पुन्हा चीनकडे सोपवले जाऊ शकते. या सैनिकाला पुन्हा चीनकडे सोपवण्याची प्रक्रिया सुरु आहे. काही महिन्यांपूर्वी भारतीय हद्दीत आलेल्या अशाच एक चिनी सैनिकाला लष्कराने पकडले होते.

classi 2.jpg
bottom of page