top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

भाजपासोबत राहिलो असतो, तर मुख्यमंत्री असतो....

भारतीय जनता पार्टीसोबत असतो, तर आतापर्यंत आपण पुन्हा मुख्यमंत्री म्हणून राहिलो असतो. पण काँग्रेससोबत आघाडी करून जे काही कमावलं होतं, ते सगळं संपलं,” असं म्हणत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जनता दल सेक्युलरचे नेते एच.डी. कुमारस्वामी यांनी मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.. मैसूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना कुमारस्वामी म्हणाले, “मी २००७ मध्ये मुख्यमंत्री म्हणून मी राज्यातील जनतेचा विश्वास पुढचे १२ वर्षे टिकवून ठेवला. पण, काँग्रेससोबत आघाडी केल्यानंतर सगळं काही गमावलं. २०१८ मध्ये काँग्रेससोबत आघाडी केल्यानंतर सिद्धारामैय्या आणि त्यांच्या समर्थक गटाने माझी प्रतिष्ठा संपवून टाकली. मी फक्त त्यांच्या जाळ्यात फसत गेलो”

classi 2.jpg
bottom of page