top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या दोन ‘स्पेशल ट्रेन’च्या वेळेत बदल

दक्षिण रेल्वेने कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या दोन विशेष ट्रेनच्या वेळेत बदल केला आहे. एर्नाकुलम – हजरत निजामुद्दीन आणि तिरुवनंतपुरम सेंट्रल- लोकमान्य टिळक टर्मिनस या दोन विशेष गाड्यांच्या वेळेत ३० नोव्हेंबरपासून बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोकण रेल्वेकडून ट्विटरद्वारे याबाबत माहिती देण्यात आली आहे. ३० नोव्हेंबर २०२० पासून या दोन्ही विशेष गाड्यांच्या वेळेत बदल होणार असून पुढील सूचना मिळेपर्यंत दोन्ही गाड्या नवीन वेळापत्रकानुसार धावतील . नवीन वेळापत्रकानुसार, ३० नोव्हेंबरपासून ०२६१७ एर्नाकुलम – हजरत निजामुद्दीन ही विशेष ट्रेन दुपारी १ वाजून २५ मिनिटांनी एर्नाकुलम जंक्शनवरुन सुटेल आणि तिसऱ्या दिवशी दुपारी १ वाजून २५ मिनिटांनी हजरत निजामुद्दीनला पोहोचेल. तर, ०२६१८ – हजरत निजामुद्दीन – एर्नाकुलम ही विशेष ट्रेन सकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी हजरत निजामुद्दीन स्थानकावरुन सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी पोहोचेल. ०६३४६ तिरुवनंतपुरम सेंट्रल-लोकमान्य टिळक टर्मिनस तिरुवनंतपुरम सेंट्रल स्थानकावरुन सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ४ वाजून ४५ मिनिटांनी पोहोचेन. तर, ०६३४५ लोकमान्य टिळक टर्मिनस-तिरुवनंतपुरम सेंट्रल ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसवरुन सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी सुटेल आणि तिरुवनंतपुरम सेंट्रल स्थानकावर संध्याकाळी ६ वाजून पाच मिनिटांनी पोहोचेन. .

classi 2.jpg
bottom of page