top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ग्रेट खलीही आंदोलनात

गेल्या काही दिवसांपासून पंजाब, हरयाणामधल्या शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरु केलं आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ डब्लू डब्लू ई सुपरस्टार ग्रेट खली उतरला आहे. त्यानं सरकारकडे शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याची आणि कृषी कायदे मागे घेण्याची मागणी केली आहे. आपण सहा महिन्यांचं रेशन सोबत घेऊन आलो असून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर त्या ठिकाणाहून हटणार नाही, असंही तो म्हणाला. सध्या सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये खलीनं सर्व लोकांना शेतकऱ्यांसोबत राहण्याचं आवाहन केलं आहे. जेणेकरून सरकार हे कायदे मागे घेण्यास आणि शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यास तयार होईल.

classi 2.jpg
bottom of page