top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

'लागिरं झालं जी' फेम ज्येष्ठ अभिनेत्री कमल ठोके यांचं निधन

सातारा: 'लागिरं झालं जी' या मालिकेतील 'जिजी' व्यक्तिरेखेमुळं घराघरांत पोहोचलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री कमल ठोके यांचं शनिवारी सायंकाळी निधन झालं. त्या ७४ वर्षांच्या होत्या. कर्करोगानं त्रस्त असलेल्या कमल ठोके यांच्यावर बेंगळुरू इथं उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांनी काल अखेरचा श्वास घेतला.
कमल ठोके यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर कराड येथील त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कमल ठोके या मूळच्या शिक्षक. तब्बल ३३ वर्षे त्यांनी शिक्षिकेची नोकरी केली. २००५ साली मुख्याध्यापिका म्हणून त्या निवृत्त झाल्या होत्या. सातारा जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कारही त्यांनी मिळवला होता. बाबा लगीन, बरड, माहेरचा आहेर, सख्खा भाऊ पक्का वैरी, आम्ही असू लाडके, नामदार मुख्यमंत्री गावडे, सासर माहेर, कुंकू झालं वैरी, भरला मळवट अशा अनेक चित्रपटांत त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. सध्या त्या 'देवमाणूस' मालिकेत काम करत होत्या.

classi 2.jpg
bottom of page