top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

जदयूचा भाजपाला इशारा!

भारतीय जनता पार्टीने एनडीएमधील आपला सहकारी पक्ष असलेल्या जदयूला अरुणाचल प्रदेशमध्ये मोठा झटका दिला आहे. जयदूच्या सात पैकी सहा आमदारांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. याबाबत जदयूमध्ये तीव्र नाराजी असल्याचे दिसत आहे. हे आघाडीच्या राजकारणासाठी चांगलं लक्षण नसल्याचं जदयूचे राष्ट्रीय प्रवक्ता केसी त्यागी यांनी पाटणा येथील पत्रकारपरिषदेत सांगितले. बिहारमधील आघाडीबाबत काही वाद नाही. अरुणाचलमधील घटनेचा बिहारमधील राजकारणावर कोणताही परिणाम होणार नाही. तसेच यावेळी त्यागी यांनी लव्ह जिहाद बाबत देखील भूमिका स्पष्ट केली.

classi 2.jpg
bottom of page