top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

उड्डाणानंतर विमान बेपत्ता

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथून उड्डाण केल्यानंतर एक विमान बेपत्ता झाले आहे. या विमानाने शनिवारी संध्याकाळी जकार्ताच्या सोकार्नो-हट्टा विमानतळावरून उड्डाण केले होते. मात्र, उड्डाणानंतर ४ मिनिटानंतर या विमानाचा संपर्क तुटला असे सांगितले जात आहे. एकूण ५९ प्रवाशांना घेऊन हे विमान निघाले होते. या विमानाच्या शोधासाठी बचाव अभियान सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत या विमानाबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. रडारवर हे विमान १० हजार फुटाच्या उंचीवर एका मिनिटात खाली आले.

classi 2.jpg
bottom of page