top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

जेलमध्ये दंगल, आठ कैद्यांचा मृत्यू

श्रीलंकेच्या राजधानी कोलंबोपासून १५ किमी अंतरावर असणाऱ्या महारा जेलमध्ये रविवारी झालेल्या दंगलीत जवळपास आठ कैद्यांचा मृत्यू झाला आहे तर जेलरसह ३७ जण जखमी झाले आहेत. महारा कारागृहातील काही कैद्यांनी दरवाजातून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झााल्यमुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कारागृह अधिकाऱ्यांना कठोर कारवाई करावी लागली. “रिमांडमध्ये असणाऱ्या काही कैद्यांनी जबरदस्तीने दरवाजा उघडण्याचा आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला,” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. कैद्यांनी यावेळी किचन व रेकॉर्ड रुमला आग लावल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

classi 2.jpg
bottom of page