top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

हैदराबादच्या निवडणूक प्रचारासाठी आता केवळ डोनाल्ड ट्रम्पच उरले - ओवेसी

हैदराबाद - हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाच्या दिग्गज नेत्यांनी हजेरी लावल्याने ही निवडणूक चांगलीच चर्चेत आली. भाजपाकडून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह यांनी हैदराबादमध्ये जाऊन या निवडणुकीसाठी जोरदार प्रचार केला आहे. या प्रचारावरून एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपाला टोला लगावला आहे.

" ही निवडणूक हैदराबादची निवडणूक असल्यासारखे वाटत नाही आहे. असे वाटतेय की नरेंद्र मोदींच्या जागी पंतप्रधानपदाची निवडणूक होत आहे. मी एका सभेत असताना म्हटलं की, इथे त्यांनी सर्वांना बोलावले. तेव्हा एक मुलगा म्हणाला की, आता त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाही बोलावले पाहिजे. त्याचं म्हणणं बरोबर आहे. आता केवळ डोनाल्ड ट्रम्पच उरले आहेत" असे म्हणत ओवेसी यांनी भाजपाला टोला लगावला आहे.

classi 2.jpg
bottom of page