top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

हज यात्रेसाठी ऑनलाईन अर्ज भरुन देण्याची मोफत सेवा

मुंबई : हज 2021 च्या यात्रेसाठी केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाने ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर 2020 असल्याची माहिती महाराष्ट्र हज समितीचे कार्यकारी अधिकारी इम्तियाज काझी यांनी दिली आहे. यावर्षी हज यात्रेसाठी इच्छुक असणाऱ्या विदर्भातील यात्रेकरुंना मोफत ऑनलाईन अर्ज भरुन देण्याची सुविधा नागपूर हज हाऊस, एम्प्रेस मिल कंपाऊंड, जुना जेल खाना रोड, नागपूर येथे करण्यात आली आहे. तरी इच्छुकांनी येथे येऊन अर्ज भरावेत, असेही महाराष्ट्र राज्य हज समितीचे श्री.काझी यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

classi 2.jpg
bottom of page