top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

बारावी परीक्षेसाठीचे अर्ज दाखल करण्याची मुदत ४ जानेवारीपर्यंत

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी नियमित विद्यार्थ्यांना १५ डिसेंबर ते ४ जानेवारीदरम्यान, तर पुनर्परीक्षार्थी, श्रेणीसुधार, व्यवसाय अभ्यासक्रम आदी विद्यार्थ्यांना ५ ते १८ जानेवारीदरम्यान ऑनलाइन अर्ज भरता येईल अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांना www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे अर्ज भरता येणार आहेत. अर्ज भरल्यानंतर शुल्क चलनाद्वारे १५ डिसेंबर ते २५ जानेवारीदरम्यान बँकेत भरायचे आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या यादी आणि प्री-लिस्ट चलनासोबत २८ जानेवारीला विभागीय मंडळात जमा करायची आहे. या वर्षी नव्याने १७ नंबरच्या अर्जाद्वारे नोंदणी करणाऱ्या खासगी विद्यार्थ्यांसाठी आवेदनपत्रे भरण्यासाठी स्वतंत्र कालावधी देण्यात येणार असल्याने त्या कालावधीत त्यांचे अर्ज भरू नयेत, असे डॉ. भोसले यांनी स्पष्ट के ले आहे.

classi 2.jpg
bottom of page