top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

पंजाब-हरयाणात हाय अलर्ट!

दिल्लीत मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला प्रजासत्ताक दिनी हिंसक वळण लागलं. काही आंदोलकांनी लाल किल्ल्यावर ध्वज फडकावला. तर दुसरीकडे पोलीस आणि शेतकरी यांच्यात प्रचंड धुमश्चक्री झाली. यामुळे दिल्लीत तणावाचं वातावरण निर्माण झाल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाने अतिरिक्त तुकड्या तैनात करण्याचे आदेश दिले असतानाच पंजाब-हरयाणामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी दिल्लीतील हिंसाचारानंतर पोलीस यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर हरयाणातील काही जिल्ह्यातील मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे माध्यम सल्लागार रवीन ठुक्राल यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिली आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंह दिल्लीतील हिंसाचारानंतर राज्यातील कायदा व सुरक्षाव्यवस्था कोणत्याही किंमतीत कोलमडता कामा नये, असे आदेश राज्याच्या पोलीस विभागाला दिले आहेत, असं ठुक्राल यांनी म्हटलं आहे.

classi 2.jpg
bottom of page