top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

फेसबुक, ट्विटर पाठोपाठ ट्रम्प यांना गुगलचाही दणका

फेसबुक, ट्विटर पाठोपाठ आता गुगल ने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या यूट्यूब अकाऊंटवर तात्पुरत्या स्वरुपाची बंदी घातली आहे. ट्रम्प यांच्या चॅनेलवरुन अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ हा हिंसेला प्रोत्साहन देत असल्याचे कारण देत यूट्यूबने ही कारवाई केल्याचे म्हटलं आहे.
सध्या सुरु असणाऱ्या राजकीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आम्ही डोनाल्ड जे. ट्रम्प यांच्या चॅनेलवरुन अपलोड करण्यात आलेला नवीन व्हिडीओ काढून टाकला आहे. हा कंटेट आमच्या धोरणांचे उल्लंघन करणारा आहे, असं यूट्यूबने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटलं आहे. या चॅनेलवरुन आता ‘किमान’ सात दिवस नवीन कंटेट अपलोड करता येणार नाही”, असंही कंपनीने पत्रकामध्ये स्पष्ट केलं आहे.

classi 2.jpg
bottom of page