top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

वसंत गीते, सुनील बागूल परतले स्वगृही

नाशिक: भाजपाचे वरिष्ठ नेते वसंत गीते आणि सुनील बागूल यांनी आज शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.वसंत गिते आणि सुनील बागुल हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आणि सध्या भाजपमध्ये होते. वसंत गिते आणि सुनील बागुल आज संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं संजय राऊत यांनी नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. यावेळी बोलताना राऊत म्हणाले, “नाशिक हा पुन्हा एकदा शिवसेनेचा भक्कम बालेकिल्ला बनावा याची जबाबदारी या दोन्ही नेत्यांची असणार आहे. शोभा मगर, प्रकाश दायमा हे देखील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्याचबरोबर इतर अनेकांनीही शिवसेनेशी संपर्क साधला असून, महापालिकेतील अनेक महत्वाच्या नेत्यांचाही यात समावेश आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत नाशिकचा पुढचा महापौर शिवसेनेचाच असेल असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.

classi 2.jpg
bottom of page