top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

बलात्काराची खोटी तक्रार, कोर्टाने सुनावली महिलेला शिक्षा

गाझियाबाद: उत्तर प्रदेशातील गाझियाबाद कोर्टाने बलात्काराची खोटी तक्रार करणाऱ्या महिलेला २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंडाच्या रकमेतील ५० टक्के रक्कम ही पीडित व्यक्तीला देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. दंड न भरल्यास १५ दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच कोर्टाने या प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे.

अधिक माहिती अशी, लोनी बॉर्डर परिसरात एक महिला आपल्या कुटुंबासह भाड्याने राहत होती. त्याच घरात रजत हा देखील भाड्याने राहत होता. ६ ऑक्टोबर २०२० रोजी महिलाने रजतवर बलात्काराचा आरोप केला. तिच्या मुलीवर त्याने बलात्कार केल्याची तक्रार तिने पोलीस ठाण्यात दाखल केली. महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी रजतला अटक केली. सदर पीडित रजत हा तीन महिने तुरुंगात कैद होता. त्यानंतर त्याला जामीन मिळाला असून पॉक्सो ॲक्ट कोर्टात या प्रकरणाची सुनावणी घेण्यात आली. शनिवारी या प्रकरणाची अंतिम सुनावणी झाली. न्यायाधीश महेंद्र श्रीवास्तव यांच्या कोर्टासमोर झालेल्या सुनावणीत साक्षीदार तपासण्यात आले. त्या आधारे हा आरोप खोटा असल्याचे कोर्टात सिद्ध झाले. कोर्टाने रजतची निर्दोष मुक्तता करत बलात्काराची खोटी तक्रार करणाऱ्या महिलेला २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतून ५० टक्के रक्कम ही पीडित व्यक्तीला देण्याचे आदेश देण्यात आले. दंडाची रक्कम न भरल्यास महिलेला १५ दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागेल, असेही आदेश देण्यात आले.

classi 2.jpg
bottom of page