top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

अंत्यसंस्कारासाठी आलेल्या १८ जणांवर काळाने घातली झडप!

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील मुरादनगर स्मशानभूमीत सुरू असलेल्या बांधकामादरम्यान मुसळधार पावसामुळे स्मशानभूमीतील गॅलरीचे छत कोसळून १८ लोकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली असून जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दुर्घटनेत स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आलेल्या १८ जणांवरच काळाने झडप घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

एका फळविक्रेत्याच्या अंत्यसंस्कारासाठी लोक स्मशानभूमीत आले होते. मात्र अंत्यसंस्कारावेळी पाऊस आल्याने लोक छताखाली उभे राहिले होते. या छताचे बांधकाम सुरू होते. मुसळधार पावसामुळे हे छत खाली कोसळले आणि त्यात अंत्यसंस्कारासाठी आलेले लोक दबले गेले. कोसळलेल्या ढिगाऱ्याखालून अनेक लोकांना बाहेर काढण्यात आले असून अजूनही काही लोक ढिगाऱ्यात दबले गेले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे असून प्रभावी पद्धतीने बचावकार्य चालवण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रशासनाला दिले आहेत.

classi 2.jpg
bottom of page