top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

अर्थसंकल्पामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक बदल

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार असून याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आज सकाळी अर्थ मंत्रालयामधून संसदेसाठी निघाण्याआधी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक बदल करण्यात आल्याची माहिती पत्रकारांना दिली. आज सकाळी पावणे नऊच्या सुमारस अर्थमंत्री सीतारामन अर्थ मंत्रलयामध्ये पोहचल्या तेव्हा त्यांनी यंदाचा अर्थसंकल्प हा पूर्णपणे पेपरलेस असेल अशी माहिती दिली. नेहमीप्रमाणे कागदपत्रं असणारी बॅग आणण्याऐवजी यावेळी सीतारामन यांच्याकडे लॅपटॉप असल्याचं पहायला मिळालं. लाल रंगाचं कव्हर असणाऱ्या या लॅपटॉपवर राजमुद्रेचे चिन्हं होतं. या अर्थसंकल्पाची डिजीटल कॉपी ऑनलाइन उपलब्ध असेल असंही सांगण्यात आलं आहे.

classi 2.jpg
bottom of page