top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

बोगस मार्कशिट प्रकरणी डेंटिस्टला अटक

मुलीला कमी मार्क मिळाले तरी MBBS ला प्रवेश मिळावा म्हणून NEET ची बोगस मार्कशिट तयार करणाऱ्या वडिलांना अटक करण्यात आली. तामिळनाडूमधील रामनाथपूरम जिल्ह्यात हा प्रकार उघडकीस आला असून धक्कादायक बाब म्हणजे मुलीचे वडिल देखील मेडिकल क्षेत्रातलेच असून ते डेंटिस्ट आहेत.

भालचंद्रन त्यांच्या मुलीला घेऊन कौन्सलिंगसाठी आल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्यांनी कौन्सिलिंगच्या वेळी सादर केलेल्या कॉल लेटरमध्ये मुलीला 610 मार्क्स दाखवण्यात आले होते. कौन्सलिंगच्या वेळी करण्यात आलेल्या फेरपडताळणीमध्ये त्यांच्या मुलीचं नाव प्रवेश यादीमध्ये तसंच कौन्सलिंग लिस्टमध्ये नसल्याचं उघड झालं. भालचंद्रन यांच्या मुलीला 27 मार्क्स पडले होते. मात्र, त्यांनी खोटी कागदपत्रं आणि कॉल लेटर तयार केलं होतं. या प्रकरणात अधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी भालचंद्रन यांना अटक करण्यात आली .त्यांची कोर्टाच्या आदेशानंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

classi 2.jpg
bottom of page