top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

दिल्लीत इस्रायली दूतावासाबाहेर बॉम्बस्फोट; घटनास्थळी सापडलं बंद पाकिट

शुक्रवारी संध्याकाळी मध्य दिल्लीतील इस्रायली दूतावासाबाहेर बॉम्बस्फोट झाला असून यामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. या स्फोटाचा तपास करण्यासाठी एका विशेष पथकाला पाचारण करण्यात आले असून त्यांना घटनास्थळी एक बंद पाकिट सापडल्याचे वृत्त आहे. बंद पाकिटावर इस्त्रायली दूतावासात काम करणाऱ्या एका अधिकाऱ्यासंबंधी मजकूर लिहिलेला आहे. या बंद पाकिटाचा आणि त्यावरील मजकूराचा बॉम्बस्फोटाशी काही संबंध आहे की नाही याचा तपास दाखल झालेले पथक करत आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य वरिष्ठ सदस्य उपस्थित असलेल्या विजय चौकवर सैन्याचा ‘बिटिंग रिट्रिट’ सोहळा सुरू असतानाच दोन किलोमीटरपेक्षाही कमी अंतरावर असलेल्या ठिकाणी हा बॉम्बस्फोट हा बॉम्बस्फोट झाला. या घटनेची सरकारने गंभीर दखल घेतली असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिली. तसेच, गृहमंत्री अमित शाह हेदेखील या घटनेवर लक्ष ठेवून आहेत.

classi 2.jpg
bottom of page