top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

वेटरने ग्राहकाला घातला ९५ हजारांचा गंडा

पुणे : हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आलेल्या ग्राहकांच्या डेबिट कार्डचे क्लोनिंग करुन त्यातून ९४ हजार ५०० रुपये काढून आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये उघडकीस आला आहे. उमेश देविदास अन्वेकर (वय ३५ , राहणार- पिंपळे गुरव) आपल्या अन्य चार मित्रांसोबत चार डिसेंबर रोजी पिंपरी-चिंचवड येथील मधुबन हॉटेल मध्ये जेवणासाठी गेले होते. त्यांनी बिल भरण्यासाठी वेटरला डेबिट कार्ड दिले होते. थोड्या दिवसांनी त्यांच्यातील तीन जणांच्या डेबिट कार्डमधून पैशांचा व्यवहार झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. तिन्ही कार्डमधून अनुक्रमे, ५० हजार, २५ हजार आणि १९ हजार ५०० रुपयांचा व्यवहार झाला होता. उमेश अन्वेकर यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. पोलिसांनी केलेल्या तपासात मधुबन हॉटेलच्या डेबिट कार्ड स्वाइप करणाऱ्या मशिनमध्ये ‘स्कीमर’ लावण्यात आल्याचं आढळलं. ‘स्कीमर’मुळे मशिनमध्ये स्वाइप झालेल्या डेबिट कार्डचे क्लोनिंग केले जाते. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी रविवारी हॉटेलच्या वेटरला अटक केली आहे. त्याने अजून काही ग्राहकांच्या डेबिट कार्डचे क्लोनिंग केले आहे का याबाबत पोलिस चौकशी करत आहेत.

classi 2.jpg
bottom of page