top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

जावयाने पाडले सासऱ्याचे दात

सोलापूर : येथील अंदप्पा यशवंत विभुते ( भारतमाता नगर,होटगी रोड ) यांची मुलगी सरोजा हिचा विवाह सांगलीतील प्रसाद शांतय्या नागमोती याच्याशी तीन वर्षांपूर्वी झाला होता. विवाहानंतर काही दिवसांनी सासरच्या लोकांनी त्रास द्यायला सुरुवात केल्याने नऊ महिन्यांपूर्वी सरोजा माहेरी आली. नऊ महिने होऊनही सासरचे लोक तिला घ्यायला आले नाहीत. शुक्रवार, दि. १ जानेवारी रोजी सरोजाला सासरी घेऊन जाण्यासाठी पती, सासरे व नणंद सोलापुरात आले होते. सरोजाला सासरी घेऊन जाण्यासाठी बोलणी चालू होती. मात्र, बोलणे चालू असतानाच प्रसाद नागमोती, कांचन शिवरुद्र चिंगळे व शांतप्पा धोंडप्पा नागमोती यांनी हुज्जत घालून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर प्रसाद याने तोंडावर हाताने मारहाण करुन दात पाडला आणि जीवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद अंदप्पा विभुते यांनी एमआयडीसी पोलिसांत दिली. त्यानुसार तिघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस नाईक ताकभाते हे करीत आहेत.

classi 2.jpg
bottom of page