top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

भररस्त्यात हल्लेखोरांनी तरुणाचं शीर केलं धडावेगळं!

तामिळनाडूमधील मदुराई शहरात सोमवारी भररस्त्यात एक थरारक घटना घडली. काही शस्त्रधारी हल्लेखोरांनी एका तरुणावर हल्ला करत त्याचं शीर धडावेगळं केलं. त्यानंतर हे कापलेलं शिर त्यांनी एका चर्चच्या बाहेर फेकून दिलं. ही सगळी घटना घटनास्थळी असलेल्या एका व्यक्तीनं आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली. दरम्यान, संशयीत आरोपींना अटक केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मदुराईतील किझहावसाल येथील मुरुगनंदम नामक एक व्यक्ती रस्त्यावरुन पायी निघाली होती. यावेळी अचानक काही शस्त्रधारी तरुणांनी एका कारमधून येऊन मुरुगनंदम यांना थांबवून त्यांच्यावर हल्ला चढविला. एका धारदार शस्त्रानं त्याचं शिर धडावेगळं केलं.
दरम्यान, ही थरारक घटना घडत असताना जवळच असलेल्या एका व्यक्तीनं आपल्या मोबाईल कॅमेरॅत याचं चित्रीकरण केलं. घटनास्थळावरुन पोलिसांनी हल्लेखोरांनी वापरलेली कार जप्त केली आहे.

classi 2.jpg
bottom of page