top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

‘कोवॅक्सिन’चा डोस घेतल्यानंतरही हरयाणाच्या आरोग्यमंत्र्यांना झाला कोरोना

कोरोनावर तयार करण्यात येत असलेली कोवॅक्सिन लसीचा ट्रायल डोस घेतल्यानंतरही हरयाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांना कोरोनाची लागण झाली आहे. आरोग्यमंत्री अनिल विज यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. २० नोव्हेंबर रोजी कोवॅक्सिनचा ट्रायल डोस घेतलेले विज कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानं लशीच्या परिणामकारकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतंय. त्यांना उपचारासाठी अंबाला येथील छावणीमधील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी करोना चाचणी करून घेण्याचं आवाहनही विज यांनी केलं आहे.

classi 2.jpg
bottom of page