top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

थंडी वाढणार, हवामान खात्याचा इशारा

मुंबई : राज्यात गेल्या आठवड्यात काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती आता उत्तर भारतातून थंडीच्या लाटा महाराष्ट्राच्या दिशेने येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सोमवारपासून राज्यातील अनेक भागांत कडाक्याची थंडी पाहायला मिळणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. मागील आठवड्यात दूर गेलेली थंडी पुन्हा परतली आहे. गेल्या 24 तासात तापमानात 1.2 अंश सेल्सिअसनं कमी झालं आहे. अशात आता पुढचे काही दिवस थंडी आणखी वाढेन असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सोबतच कोरोनाचा धोका टाळण्यासाठी नियमांचेही पालन करावे अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

classi 2.jpg
bottom of page