top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

आता सोसायट्यांना सीसीटीव्ही बंधनकारक

मुंबई : मुंबई पोलिसांनी कायद्याच्या कलम144 मधील तरतुदीनुसार शहरातील सर्व खासगी संस्था, आस्थापना यांना सीसीटीव्ही बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. या खासगी संस्था, आस्थापनांच्या बाहेरील सर्व परिसर हा सीसीटीव्हीच्या नजरेत आला पाहिजे, त्यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. गुन्हेगारीला आणि चोरीला आळा घालण्यासाठी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. मात्र, मुंबईच्या गल्ली बोळात आणि लहान रस्त्यावर याचा फायदा होत नाही. त्यामुळेच शहरातील सर्व खासगी संस्था, आस्थापनांनी सीसीटीव्ही बसवल्यास अधिक परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली येणार आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गुणवत्ता आणि रेकॉर्डींग क्षमता खराब नाही याकडेही लक्ष देण्यात येणार असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

classi 2.jpg
bottom of page