top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

दैव बलवत्तर ! कार तीनदा पलटुनही तिघे बचावले

शिर्डीः पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव जाणाऱ्या कारचा पुढचा टायर फुटल्यानं गाडी एक दोनदा नव्हे, तर तब्बल तीन वेळा पलटली. केवळ दैव बलवत्तर असल्याने कारमधील तिघेही बचावले. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय. हा भीषण अपघात पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगाव येथे सकाळच्या सुमारास घडलाय.

राहुल दौलतराव बडवर आणि त्यांची पत्नी प्रियंका आणि मुलगा अन्वेश हे सर्वजण पुण्याहून आपल्या कारने ( एमएच 14 जेए 2926) मूळगावी वाकदला गेले होते, सोमवारी सकाळी ते वाकद येथून संगमनेरमार्गे पुण्याच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. सकाळी पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगाव शिवारात आले असता अचानक कारचा पुढील डाव्या बाजूचा टायर फुटल्याने त्यांची कार तब्बल तीन वेळा पलटली. यात राहुल बडवर यांच्या हाताला मोठी जखम झाली असून, पत्नी आणि तीन वर्षांचा मुलगा थोडक्यात बचावले. आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत कारला सरळ केले. कार ज्या ठिकाणी पलटी झाली तेथून काही अंतरावरच खोल दरी होती. जर त्या दरीत कार गेली असती, तर मोठा अनर्थ घडला असता, अशी माहिती तेथील नागरिकांनी दिलीय. केवळ दैव बलवत्तर असल्याने बडवर कुटुंब हे बालंबाल बचावले असल्याची चर्चा होत आहे.

classi 2.jpg
bottom of page