top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

यंदाचा अर्थसंकल्प पेपरलेस

कोरोना निर्बंधांमुळे यावर्षी अर्थसंकल्पाच्या दस्तऐवजाची छपाई केली जाणार नसून खासदारांना त्याचे इलेक्ट्रॉनिक वितरण करण्यात येणार आहे. यापूर्वी हलवा कार्यक्रमाने अर्थसंकल्पाच्या छपाईला सुरुवात केली जात होती. केंद्रीय अर्थसंकल्पातील नव्या आर्थिक वर्षासाठीच्या अन्य उपाययोजनांबाबतच्या दस्तऐवज, मिळकत आणि खर्च याबाबतचे दस्तऐवज, त्याचबरोबर वित्त विधेयक आणि नव्या करांबाबतचा सविस्तर तपशील मोबाइल अ‍ॅपद्वारे खासदारांना वितरण करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच केंद्रीय अर्थसंकल्प (२०२१-२२) कागदविरहित पद्धतीने सादर केला जाणार आहे. संसदेत १ फेब्रुवारी २०२१ रोजी अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. मोबाइल अ‍ॅपद्वारे खासदार, नागरिकांना अर्थसंकल्पाचा दस्तऐवज सहज उपलब्ध होणार आहे.

classi 2.jpg
bottom of page