top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

राहुल गांधींना समजून घेण्यात शरद पवार कमी पडले – बाळासाहेब थोरात

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याकडे सातत्याचा अभाव असल्याचं शरद पवार यांनी एका मुलाखतीत म्हंटल होतं. यावरुन महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिलं आहे. “राहुल गांधी आमचे नेते असून त्यांचं नेतृत्व पक्षानं स्विकारलं आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली देशपातळीवर काँग्रेस पक्ष संघटीत होतो आहे. त्यांनी जिवनात जे दुःख पाहिलं, त्यांच्यावर जे आघात झाले त्यातूनही सावरत ते नेतृत्व करतायत. शरद पवार यांचं ज्येष्ठत्व आम्ही मान्य करतो, परंतू ते राहुल गांधी यांना समजून घेण्यात कमी पडले असं वाटतं.” बाळासाहेब थोरात यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

classi 2.jpg
bottom of page