top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

भाजप नेते गोपाळराव पाटील यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश

कोल्हापूर : कोल्हापुरातील भाजपच्या एका नेत्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गोपाळराव पाटील यांनी अवघ्या तीन वर्षात भाजपला रामराम ठोकत काँग्रेसचे दिग्गज नेते सतेज पाटील यांच्या उपस्थितीत घरवापसी केली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या जिल्ह्यातच गळतीला सुरुवात झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

तीन वर्षांपूर्वी गोपाळराव पाटील यांनी काँग्रेसला अलविदा करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. गोपाळराव पाटील यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी तिकीट देण्यात येईल असे, असे आश्वासन दिले असतानां भाजपने ऐनवेळी शिवाजी पाटील यांना तिकीट देऊन गोपाळराव यांना डावलल्याचंही त्यांच्या समर्थकांकडून सांगितलं जात आहे. परंतु वरिष्ठ नेत्यांनी पक्ष प्रवेशाच्या वेळी दिलेला शब्द पाळला नसल्याची नाराजी गोपाळरावांनी व्यक्त केली होती. ते गेल्या अनेक दिवसांपासून नाराज होते.

classi 2.jpg
bottom of page