top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

भाजपाच्या माजी आमदाराला तीन वर्षांचा तुरुंगवास

अकलेरामधील तत्कालीन उपविभागीय दंडाधिकारी रामनिवास मेहता यांच्यावर रिव्हॉलव्हर रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणी राजस्थानमधील झालावर जिल्ह्यातील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने मनोहरथाना येथील माजी आमदार, भाजपा नेते कंवरलाल मीणा यांना तीन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

हे प्रकरण १५ वर्ष जुनं असून या घटनेनंतर आमदाराला अटक करण्यात आली होती. मनोहरथानाच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी २०१८ साली मीणा यांची निर्दोष मुक्तता केली होती. या निर्णयाविरोधात सरकारी वकील असणाऱ्या अकलेरा यांनी अतिरिक्त जिल्हा न्यायालयामध्ये याचिका दाखल करत निकालाला आवाहन दिलं. अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने या प्रकरणामध्ये सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोन वर्षांचा तुरुंगवास आणि दंड तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

classi 2.jpg
bottom of page