top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

बर्ड फ्लूची अफवा पसरविल्यास होणार कारवाई

ठाणे : बर्ड फ्लूबाबत अपुऱ्या आणि चुकीच्या माहितीवर दिशाभूल किंवा सोशल मीडियावर अफवा पसरविली तर संबंधितांवर सायबर गुन्हे कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली आहे. बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी कार्यालयामध्ये जिल्हास्तरीय यंत्रणेची आढावा बैठक घेतली. जिल्ह्य़ात एकूण ७ जलद प्रतिसाद पथके तयार करण्यात आली असून त्यांच्या माध्यमातून सर्वेक्षण पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी बैठकीत दिले.

classi 2.jpg
bottom of page