top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

बिहारमध्ये उपमुख्यमंत्री पदाबाबत सस्पेन्स कायम

बिहारच्या मुख्यमंत्रीपदासाठी नितीश कुमार यांच्या नावाची निवड झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदावरुन रंगलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. भाजपा नेतृत्वात बदल होत असल्याने मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची चिन्ह दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर आता भाजपाचे तारकिशोर प्रसाद सिंह व रेणुदेवी यांची नावं उपमुख्यमंत्री पदासाठी शर्यतीत असल्याचे समोर येत आहे.

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी तारकिशोर प्रसाद सिंह यांची भाजपाचे विधिमंडळ नेते म्हणून निवड झाल्याचं जाहीर केलं होतं. तर, भाजपाच्या विधीमंडळ उपनेतेपदी रेणुदेवी यांची निवड झाल्याबद्दल सुशीलकुमार मोदी यांनी त्यांचे देखील अभिनंदन केले आहे. या सर्व घडामोडींदरम्यान सुशीलकुमार मोदी यांनी केलेल्या ट्विटमुळे नव्या चर्चेला उधाण आलं आहे.

माझ्याकडून कार्यकर्ता हे पद कोणी काढून घेऊ शकत नाही असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. “भाजपा तसंच संघ परिवाराने मला ४० वर्षाच्या राजकीय जीवनात इतकं दिलं आहे जे इतर कोणाला मिळालं नसेल. यापुढेही जी जबाबदारी दिली जाईल ती पार पाडेन. माझ्याकडून कार्यकर्ता हे पद कोणी काढून घेऊ शकत नाही,” असं सुशीलकुमार मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

classi 2.jpg
bottom of page