top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला काँग्रेसचा पाठिंबा

दिल्ली: मागील १० दिवसांपासून कडाक्याच्या थंडीतही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. सरकारशी चर्चेनंतरही तोडगा निघत नसल्याचं दिसत असल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी ८ डिसेंबरला भारत बंदची हाक दिली आहे.काँग्रेसने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत ८ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णयही घेतला असल्याची माहिती काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी दिली. “आठ तारखेला होणाऱ्या भारत बंदला काँग्रेस पक्षाचं समर्थन असेल. आम्ही आमच्या पक्ष कार्यालयांबाहेरही आंदोलन करणार आहोत. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ राहुल गांधींनी टाकलेलं हे मजबूत पाऊल असेल. भारत बंद आणि आंदोलन यशस्वी होवो यासाठी आम्ही प्रयत्न करु.” असेही त्यांनी सांगितले.

classi 2.jpg
bottom of page