top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

... तर ग्राहक नाही, बँक असेल जबाबदार

एखाद्या व्यक्तीच्या बँक खात्यातून हॅकरने किंवा अन्य कारणास्तव रक्कम काढून फसवणूक केली आणि त्यात ग्राहकाचा हलगर्जीपणा नसेल तर अशा परिस्थितीत त्याला बँक व्यवस्थापन जबाबदार असेल. यासंदर्भात राष्ट्रीय ग्राहक तंटा निवारण आयाेगाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. आयाेगाचे न्यायाधीश सी. विश्वनाथ यांनी क्रेडिट कार्डामुळे एका अनिवासी भारतीय महिलेच्या झालेल्या फसवणूक प्रकरणात एचडीएफसी बँक व्यवस्थापनाला जबाबदार धरले आहे. आयाेगाने पीडित महिलेला ६,११० डाॅलरची (अंदाजे ४.४६ लाख रुपये) रक्कम १२ टक्के व्याजासह परत करण्याचे आदेश दिले आहेत.

classi 2.jpg
bottom of page