
महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Sunday, 23 November 2025
.mahanewsonline.com


शेतकरी पाकिस्तानी नाहीत, केंद्रानं त्यांचं ऐकावं : अण्णा हजारे
केंद्र सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी रस्त्यावर उतरले असून शेतकऱ्यांनी ‘चलो दिल्ली’ची हाक दिली होती. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला हिंसक वळण लागले. काही शेतकऱ्यांवर दंगलीचे गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं समर्थन केलं आहे. शेतकरी इतक्या दिवसांपासून आंदोलन करत आहेत हे देशाचं दुर्देव असल्याचेही ते म्हणाले. जे शेतकरी आंदोलन करत आहेत ते पाकिस्तानी नाहीत. आपल्याच देशातील आहेत. निवडणुकांच्या दरम्यान जसं तुम्ही मतं मागण्यासाठी त्यांच्या घरापर्यंत शेतापर्यंत जाता तसं त्यांच्या समस्याही सोडवा, शेतकऱ्यांसोबत आज जे काही घडत आहे ते भारत पाकिस्तान संघर्षाप्रमाणे झालं आहे. शेतकरी देशाचे शत्रू नाहीत. सरकारनं त्यांच्यासोबत चर्चा करून मार्ग काढायला हवा,” असंही अण्णा हजारे यावेळी म्हणाले .

