
महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Sunday, 4 May 2025
.mahanewsonline.com



……आणि आमिर खानने सोशल मीडियाला ठोकला रामराम
मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात आमिर खानचा १४ मार्चला वाढदिवस झाला. आमिरनं वाढदिवसाला एक असा संकल्प केला आहे की त्यामुळे त्याच्या चाहत्यांचा हिरमोड झाला. आमिरने आपले चाहते, मित्रमंडळी सगळ्यांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा स्विकारल्या आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी एक मोठी घोषणा केली, ५६व्या वाढदिवशी सोशल मीडियावरुन निवृत्ती घ्यायची आणि पूर्ण लक्ष आपल्या कामावर केंद्रित करण्यासाठी सोशल मीडिया सोडण्याचं आमिरने ठरवलं
“माझ्यावर प्रेम केल्याबद्दल आणि माझ्या वाढदिवसाला माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव केल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. “ही माझी सोशल मीडियावरची शेवटची पोस्ट असेल. असंही मी फारच ऍक्टिव्ह होतो सोशल मीडियावर पण तरीही मी इकडून रजा घेण्याचा निर्णय घेतला आहे.” त्याच्या ऑफिशिअल टीमचं हँडल शेअर करत आपण आता यावरून त्याच्याबद्दलचे अपडेट्स मिळतील असंही त्याने सांगितलं