top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

… म्हणून 30 किलो संत्री अर्ध्यातासात केले फस्त

आपल्या सर्वांना माहितच आहे की, संत्री आरोग्यासाठी उपयुक्त आहे. यामधून व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात मिळते. संत्रामध्ये केवळ 60 कॅलरीज असून चरबी, कोलेस्टेरॉल नसते. व्हिटॅमिन सी साठी डॉक्टरही आपल्याला संत्र्याचा ज्यूस पिण्यास सांगत असतात. परंतु, जर तुम्ही संत्री जास्त प्रमाणात खाल्ले तर त्याचा तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होईल. अशीच एक घटना चीनच्या युनान प्रांतात घडली आहे.

वांग नावाच्या एका व्यक्तीने आपल्या मित्रांसाठी ३० किलो संत्री एका बॉक्समध्ये आणले होते. मित्रांसोबत ते बिजनेस ट्रिपला निघाले होते. संत्र्याचा बॉक्स त्यांनी ५० युआन ( जवळपास ५६४ रुपये) देऊन खरेदी केला होता. पण विमानतळावर पोहोचल्यावर सामान जास्त असल्याचं त्यांना सांगण्यात आलं. एक्स्ट्रा सामानासाठी त्यांना ३०० युआन ( जवळपास३,३८४ रुपये) द्यावे लागले असते. मग काय… वांग आणि त्याच्या मित्रांनी अतिरिक्त शुल्क खूप जास्त असल्यामुळे सर्व संत्री तिथेच खाण्याचं ठरवलं. त्याच्या मित्रांनी आणि त्याने विमानतळावरच उभे राहून संत्रे खाण्यास सुरूवात केली आणि २० ते ३० मिनिटांमध्ये सर्व संत्री संपवलेही. पण, इतके संत्री खाल्ल्यामुळे त्यांच्या तोंडात अल्सरचा त्रास होऊ लागला. विमानतळावर येणारे-जाणारे अन्य प्रवासीही त्यांना उभं राहून इतके संत्री खाताना पाहून हैराण झाले होते.

classi 2.jpg
bottom of page