top of page

तुळस

हिंदू संस्कृतीत पूजनीय असणाऱ्या तुळशीचे औषधीय गुणधर्मही तितकेच महत्त्वाचे आहेत. तुळस आरोग्यासाठी अतिशय गुणकारी मानली जाते. तुळशीच्या घरात असण्याने फक्त सकारात्मक उर्जाच प्राप्त होत नाही, तर बऱ्याच आजारांपासून आपल्याला सुटका देखील मिळते. तसेच आयुर्वेदामध्येही तुळशीचे मोठे योगदान आहे. जाणून घेवू याता तुळशीचे फायदे...

Tulas

हे आहेत फायदे ... 

⬛ तणाव विरहीत जीवन जगण्यासाठी रोज १० ते १२ तुळशी पाने रोज खावीत. याने मज्जासंस्थेला आराम मिळून तणाव कमी होण्याची शक्यता असते.

⬛ तुळशीत मोठ्या प्रमाणात ॲन्टी-बॅक्टेरियल आणि ॲन्टी-इंफ्लिमेंट्री गुण असतात. जे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्याचे काम करतात.

⬛ तुळशीच्या पानांचा रस तापाचे प्रमाण कमी करण्यास मदतगार ठरतो.

⬛ तुळशीचा काढा सर्दी-खोकल्यावर रामबाण मानला जातो. काढा बनवण्यासाठी तुळशीची पानं पाण्यात टाकून त्यात काळी मिरी आणि खडीसाखर मिसळून त्याचे सेवन करा. सर्दीसाठी हा काढा अतिशय गुणकारी ठरतो.

⬛ गरम पाण्यात तुळशीची पाने टाकून गुळणी करावी. दमा आणि ब्राँकायटिस असणाऱयांनाही हे लाभदायक ठरते.

⬛ महिलांना मासिक पाळीदरम्यान अनेक प्रकारच्या समस्या होत असतात. या दिवसांत महिलांना अतिशय त्रासाला सामोरं जावं लागतं. अशा त्रासावेळी तुळशीच्या बिया फायदेशीर ठरतात. मासिक पाळीमधील अनियमितता दूर करण्यासाठी दररोज तुळशीच्या पानांचे सेवन करणे फायद्याचे ठरते.

⬛ तुळशीची पाने आणि चंदनाची पेस्ट करून कपाळावर लावल्याने डोकेदुखी कमी होण्यास मदत होते.

⬛ डोळ्यांच्या समस्यांवर तुळशीच्या काळ्या पानांचा रस महत्त्वाची भूमिका निभावतो. तुळशीच्या काळ्या पानांच्या (कृष्ण तुळस) रसाचे काही थेंब डोळ्यात टाकल्याने दाहकात कमी होण्यास मदत होते.

⬛ रोगप्रतिकारक शक्ती वाढवते

⬛ तुळशीच्या पानांची पावडर मोहरीच्या तेलात मिसळून पेस्ट तयार करून या पेस्टने दात घासावेत. यामुळे हिरड्या, दात दुखणे यावर तात्काळ उपचार होतो.

⬛ त्वचेच्या समस्यांवरही तुळशीच्या पानांचा रस गुणाकारी आहे.

⬛ डास आणि इतर कीटकांचे चावणे मुख्यत: मान्सूनच्या महिन्यात अशा समस्या वाढतात. अशावेळी ज्या ठिकाणी किटक चावला आहे तेथे तुळशीच्या मुळांची पेस्ट लावावी.

⬛ किडनी स्टोनच्या समस्येला सामोरे जाणाऱयांनी मध आणि तुळशीच्या पानांच्या रस मिश्रित मिश्रण प्यावे.

* आपल्या डॉक्टरांच्या / वैद्यांचा सल्ला घेतल्याशिवाय वरील औषधी वनस्पतींचा वापर करू नये.  

bottom of page