top of page

लसून

स्वयंपाकाची चव वाढावी, यासाठी फोडणीमध्ये लसणाचाही वापर केला जातो. लसणामध्ये असलेल्या औषधी गुणधर्मामुळे आपल्या आरोग्याला भरपूर फायदे मिळतात. यातील पोषक घटकांमुळे कित्येक आजारांपासून आपलं संरक्षण होण्यास मदत मिळते. आयुर्वेदामध्ये लसूण हे एक औषध म्हणून ओळखलं जातं. यामुळे आपल्या आहारामध्ये लसणाचा समावेश करावा. लसूण खाल्ल्यानं आरोग्याला मिळणारे फायद्यांची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Garlic

हे आहेत फायदे ... 

⬛ निरोगी आरोग्यासाठी सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी एक ग्लास पाण्यासोबत कच्चे लसूण खावे, यामुळे तुम्हाला भरपूर फायदे मिळतील.

⬛ वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवायचे असेल तर आहारामध्ये लसणचा समावेश करा. याव्यतिरिक्त लसूणमुळे शरीरातील फॅट्स देखील कमी होतात. नियमित

⬛ सकाळी पाण्यासोबत लसूण खाल्ल्यास पचनाशी संबंधित समस्या देखील कमी होतील.

⬛ पाण्यासोबत कच्चे लसूण खाल्ल्यानं शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात.

⬛ मधुमेह, नैराश्य आणि कित्येक प्रकारच्या कॅन्सरमुळे तुमचा बचाव देखील होऊ शकतो.

⬛ लसणामध्ये अँटी डायबेटीकचे गुणधर्म आहेत. मधुमेहींसाठी लसूण अतिशय लाभदायक आहे.

⬛ एक ते दोन आठवडे लसूणचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

⬛ लसूणमध्ये ॲलिसिन नावाचं कम्पाउंड असतं. यामुळे सर्दी-खोकल्याची समस्या कमी होते. लसूणमुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढून गंभीर आजारांपासून आपले संरक्षण होते.

⬛ शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी लसूण लाभदायक आहे. लसूणच्या सेवनामुळे शरीरातील हानिकारक कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते.

⬛ हाडे मजबूत व्हावीत, यासाठी नियमित कच्चे लसूण खावे. यामुळे तुमच्या शरीराला कॅल्शिअमचा पुरवठा होतो.

⬛ जी लोक दम्यामुळे हैराण आहेत, त्यांच्यासाठीही लसूण खाणे फायदेशीर ठरू शकतं.

⬛ गर्भावस्थेत सुरुवातीच्या काही दिवसांत लसूणचे सेवन करू शकता. गर्भवती महिला आणि पोटातील बाळासाठी लसूण खाणे फायदेशीर असते. पण लसूणचे सेवन करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण प्रत्येक महिलेला लसूण खाणे फायदेशीर ठरेलच, असे नाही.

⬛ मुरुमांच्या समस्यामुळे हैराण असाल तर लसूण खाणे अतिशय फायदेशीर ठरेल. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक देखील येते.

⬛ तोंडाला येणारी दुर्गंधी देखील लसूणमुळे कमी होण्यास मदत मिळते. यावर उपाय म्हणून तुम्ही माउथ फ्रेशनर म्हणून तुम्ही लसूणचा वापर करू शकता.

⬛ खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे, सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे आणि बदलत्या जीवनशैलीमुळे हा त्रास होऊ शकतो. पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहारामध्ये लसूणचा समावेश केल्यास सुरकुत्यांपासून तुमची सुटका होऊ शकते.

⬛ गर्भावस्थेत, डिलिव्हरीनंतर किंवा वाढत्या वयोमानानुसार महिलांच्या शरीरावर स्ट्रेच मार्क्स येऊ लागतात. हे बदल अतिशय सामान्य आहेत. पण यापासून सुटका हवी असल्यास तुम्ही लसणाची मदत घेऊ शकता.

⬛ लसूण खाल्ल्यानं रक्ताच्या गाठी बनत नाहीत. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता ही कमी होते. लसूण आणि मध एकत्र करून खाल्ल्यानं हृदयाच्या धमन्यांमध्ये असलेले ब्लॉकेज दूर होतात. त्यामुळे हृदयाचा रक्तप्रवाह सुरळीत सुरू राहतो.

⬛ लसणाचे तेल तळहात आणि तळपायाला लावल्यास डास जवळ येत नाहीत. तसेच त्वचाही नितळ होते.

⬛ सांधेदुखीसाठी लसूण अतिशय गुणकारी आहे.

⬛ लसूण नियमित सेवन केल्यास दातांच्या दुखण्यामध्ये आराम मिळतो. दात दुखत असल्यास लसणाची पेस्ट करून दातांवर ठेवावी. लगेच आराम मिळेल.
(लसूणचे अति प्रमाणात सेवन केल्यास छातीत जळजळ किंवा पोटाच्या समस्या निर्माण होऊ सकतात.)

* आपल्या डॉक्टरांच्या / वैद्यांचा सल्ला घेतल्याशिवाय वरील औषधी वनस्पतींचा वापर करू नये.  

bottom of page