top of page

आंबेहळद

आंबेहळद ही प्रत्येक घरात असतेच. ही अनेक गुणांनी युक्त असते. आंबेहळद काहीशी हळदीसारखी असली तरी थोडी उग्र असते. शरीरावर चोळण्यासाठी आणि लेप देण्यासाठी आंबेहळद वापरतात.

Ambehalad

हे आहेत फायदे ... 

⬛ कोणत्याही कारणाने दुखापत होऊन रक्त साकळले असल्यास आंबेहळद उगाळून कोमट करून लावावी. याने सूज कमी होते त्याचप्रमाणे वेदना शांत होतात.

⬛ शरीरातील कोणत्याही भागात गाठ आली असेल तर आंबेहळदीच्या लेपाने ती बसते.

⬛ अंगावर खरका उठल्यास आंबेहळद, कडूजिरे गोमूत्रात वाटून लावतात. यामुळे हा त्रास कमी होतो. खरका म्हणजे अंगावर उठलेल्या बारीक पुळय़ा लचकणे, मूरगाळणे, सुजणे यावर त्वरित आराम मिळविण्यासाठी आंबेहळदीचा लेप लावतात. यामुळे ओढ बसून वेदना कमी होतात.

⬛ चिमूटभर आंबेहळद आणि मलई एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास त्वचेचा रंग उजळतो.

⬛ सर्दी, पडसे, खोकला, दमा या विकारांकरिता रजन्यादिवटी या औषधाचे योगदान खूपच आहे. त्यात आंबेहळद हे एक प्रमुख घटकद्रव्य आहे.
आंबेहळदीचे चूर्ण घेतल्यामुळे भूक चांगली लागते आणि लहान व मोठय़ा आतडय़ातील वायू मोकळा होतो.

⬛ पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना पचनाकरिता आंबेहळदीचा विशेष उपयोग होतो. आंबेहळदीला हळदीप्रमाणेच लवकर कीड लागू शकते. त्यामुळे कीड न लागलेल्या आंबेहळदीचाच वापर लेप लावण्याकरिता आणि पोटात घेण्याकरिता प्रशस्त आहे.

⬛ काही कारणाने यकृत किंवा पांथरीला सूज आल्यास आंबेहळदीचा दाट व गरम लेप लावल्यास एक-दोन आठवडय़ात सूज कमी होते.

⬛ शरीराला काही कारणाने काळसरपण किंवा अनाकर्षकता आली असेल तर तरुणाईने ताज्या आंबेहळदीचा लेप चेहऱ्यावर अवश्य लावावा.

* आपल्या डॉक्टरांच्या / वैद्यांचा सल्ला घेतल्याशिवाय वरील औषधी वनस्पतींचा वापर करू नये.  

bottom of page